द्राक्षाचे सरबत

साहित्य :

  • साधारण २ कि.द्राक्षे
  • १ लि.रसाला १ लि.पाणी
  • २ कि. साखर
  • अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • १ चमचा सोडियम बेन्झॉइट
  • १ चमचा टोनोग्रीन इसेंस (रंग व इसेंस एकत्र असतो.)

कृती :

प्रथम द्राक्षे धुऊन घ्यावीत. (काळी, हिरवी) व ५ मिनिटे पाण्यात शिजवून व पुरण यंत्रातून काढावीत. निघालेला रस १ लि. असेल तर १लि. पाणी घ्यावे. ११ लि. पाणी साखरेत एकत्र करून अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे. एक उकळी येईपर्यंत ढवळावे. उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. गार झाल्यावर त्यात द्राक्षाचा रस ओतून त्यात १ चमचा सोडियम बेन्झॉइट घालावे. पाव भाग सिरप, पाऊण भाग पाणी, बर्फाचा खडा, चवीला हवे असल्यास मीठ टाकावे.