दूध पावडरची रसमलाई

साहित्य:

  • १ लीटर दूध
  • ९ चमचे दुधाची पावडर
  • १ टेबलस्पून मैदा
  • १ चमचा तूप
  • अडीच वाट्या साखर
  • दीड वाटी पाणी
  • थोडेसे दही
  • एक‍अष्टमांश चमचा बदाम इसेन्स

कृती:

दूध आटवून घ्यावे त्यात पाऊण वाटी साखर घालावी. साखर विरघळली की दूध गार होऊ द्या.
दुधाची पावडर, मैदा व तूप एकत्र करुन थोडे दही घालून पीठ तयार करवे. फार घट्ट नको, फार सैल नको. नंतर त्याचे सुपारीपेक्षा जरा लहानच गोळे करावे. साखरेत पाणी घालून कच्चा पाक करावा. पाकाला उकळी आली की त्यात वरील गोळे सोडावे व शिजू द्या. नंतर हे गोळे पाकातून काढून आटवलेल्या दुधात घालावे.व अगदी गार झाले की वाढावे.