दुध्याची वडी दुधी हलवा

साहित्य :

  • १ डबा कंडेन्स्ड मिल्क
  • १ किलो कोवळा दुधी
  • ३ चमचे लोणकडे तूप
  • अर्धा चमचे वेलचीपूड
  • सजावटीसाठी चारोळ्या
  • काजू काप इत्यादी.

कृती :

दुध्याची वडी दुधी हलवा

दुध्याची वडी दुधी हलवा

दुधी सोलून किसावा व प्रेशरकुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावा. दुध्याला पाणी सुटते त्यातच शिजावावा. शिजल्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क, तूप घालावे. मध्यम आंचेवर चांगले ढवळावे. मऊ हलवा हवा असेल तर सातआठ मिनिटे ढवळून खाली उतरवावे व शोभिवंत भांड्यात काढावे. वेलचीपूड व सुका मेवा घालून सजवावे.

वड्या हव्या असतील तर मिश्रणाचा गोळा होऊन पातेल्याच्या कडेने सुटू लागले की खाली उतरावावे. तोवर एका ताटाला तुपाचा हात फिरवावा व मिश्रण जरा घोटून त्यात ओतावे व ताट हलवून किंवा चमच्याने सारखे करावे. त्यावर वेलचीपूड शिवरावी. मिश्रण निवाले की फ्रीजमध्ये ठेवावे. घट्ट झाले की सुरीने वड्या कापाव्या.

वडी खुसखुसीत होण्यासाठी चार चमचे पिठीसाखर मिश्रण खाली उतरल्यावर घालावी व पाचदहा मिनिटे घोटावे.