आकर्षक राख्यांनी सजली पुण्याची बाजारपेठ

रक्षाबंधन

परस्परातील स्नेहभाव दृढ व्हावेत आणि नात्यांची वीण अधिक घट्ट व्हावी म्हणुनच आपण निरनिराळे सण साजरे करत असतो. राखीपैर्णिमा हा त्याचाच एक भाग. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दिर्घ आयुष्य आणि उज्जवल भविष्याची कामाना करते. भाऊही आपल्या बहिणाला तिच्या रक्षणासाठी तिच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचे वचन देतो. लहाणपणी एकत्र बागडलेली भावंड मोठेपणी दुरावतात. बहिणचे लग्न होते ती सासुरवाशिण होते. पण हिच भांवड राखीपैर्णिमेच्या निमित्ताने एकत्र येतात. पुर्वी जर काही कारणासत्व जर भावाबहिणीचे रक्षाबंधनाला भेटणं होणार नसेल तर १५ दिवस आधिच पोस्टाने राख्या पाठवल्या जायच्या. परंतु काळ बदलला दळवळणाची साधानही वाढली तस तसे पोस्टाने राख्या पाठवण्याचे प्रमाण ही घटले. आपल्याकडे प्रत्येक सणांच रुपडं पालटत चालेलं आहे. पुर्वीच्या साध्या गोडंयाच्या रेशमी राख्यांची जागा वैविधपुर्ण राख्यांनी घेतली आहे. सणाच्या १५ दिवस आधि बाजारापॆठ विविध रंगाच्या राख्यांनी सजुन जाते. १रुपयापासून ते ६० रुपायांपर्यत या राख्या उपलब्ध आहेत. आता तर सोन्या चांदीच्या राख्या हि बाजारात उपलब्ध आहे. ज्याच्या त्याच्या ऎपतीनुसार राख्यांची निवड ठरते. शेवटी धागा आणि त्यामागचा स्नेह महत्वाचा.

बाजारात रेशीम धाग्यात विणलेल्या आकर्षक राख्या दिसतात. टिकल्या. खडे , रुद्राक्ष, कुदंन याचा वापर करुन बनवलेल्या राख्या अनेकांच्या पंसतीस उतरत आहे. बच्चेकंपनीला तर राख्यांचे खास आकर्षण असते. मिकी, डोनाल्ड, पॉकीमॉन, डोरेमॉन, पावर रेंजर्स, बाळकृष्ण हनुमान, बालगणेश, तसेच मुझिकल आणि लायटिंगची राखी लाहानग्या साठी आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. भावाने बहिणीला दयायच्या भेटवस्तुंची बाजारात चलती आहे. यात चॅकलेट्स पासून डायमंड ज्वेलरी पर्यंत विविध ब्रॅन्ड्स ची विविध उत्पादने बाजारात आहेत.

रक्षाबंधन हा सण नारळी पैर्णिमा म्हणुनही ओळखला जातो. कोळी बांधवाचा हा खास सण. वर्षभर दर्याराजाकडुन मिळणार्‍या मासळीवर त्यांची उपजिवीका चालते त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव हा सण साजरा करतात. पावसाळ्यातले काही दिवस मासेमारी बंद असते. या दिवशी कोळी बांधव खवळलेल्या दर्याला शांत करण्यासाठी नारळ अर्पण करुन समुद्रात पुन्हा मासेमारी चालु करतात. या दिवशी खास नारळी भात तसेच नारळाच्या वडया करण्याची पध्द्त आहे.

पुण्यात उपलब्ध असलेल्या विविध राख्या