फेसबुक पोहोचणार एका नवीन स्तरावर

फेसबुकचा लोगो

फेसबुकचा लोगो

फेसबुक, जी सर्वांत मोठी सोशल नेटवर्किंग साईट आहे, तिच्याकडे केवळ नोटिफिकेशन, फ्रेंड रिक्वेस्ट, चॅट आणि टाईमपास याच दृष्टिकोनातून पाहिले जाते. मात्र, आता फेसबुक तुम्हाला जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत एक चांगली नोकरीही मिळवून देणार आहे.

असे बोलले जात आहे की, फेसबुक एका नव्या स्तरावर जाण्यासाठी लवकरच आपले जॉब बोर्ड सुरु करणार आहे. नोकरी देणाऱ्या अनेक कंपन्यांची फेसबुक मदत घेणार आहे. कमीत कमी ब्रांचआऊट, जॉबविटे आणि वर्क ४ लैब्स या तीन मोठ्या कंपन्यांची फेसबुक नक्कीच मदत घेईल.

लिंक्डईन ही एक प्रोफेशनल वेबसाईट आहे व या वेबसाईटच्या वाढत्या दबदब्याला लक्षात घेऊन फेसबुक हे पाऊल उचलत असल्याचे बोलले जात आहे. लिंक्डईनला टक्कर देण्यासाठी आणि प्रोफेशनल नेटवर्किंगच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी फेसबुक ही सेवा उपलब्ध करुन देणार आहे.

तज्ञांचे म्हणणे आहे की, नवीन क्षेत्रात पाऊल ठेवण्याबरोबरच त्यातील पैसा हे गुंतवणुकीमागचे प्रमुख कारण आहे.