फोर फ्रुट सरबत

साहित्य :

  • दोन सफरचंद
  • पाव किलो काळी द्राक्षे
  • अर्धा गोड अननस
  • पाव कलिंगड
  • मिरी पूड
  • मीठ
  • चवीपुरती साखर

कृती :

सफरचंद, अननस व कलिंगड साले काढून फोडी करून घ्याव्यात. काळ्या द्राक्षातील मधली बी काढून टाकावी. हे सर्व जिन्नस ज्युसरमधून काढतानाच त्यात आवश्यकतेनुसार साखर व चवीपुरते मीठ घालावे. सर्व्ह करताना बर्फ व मिरे पूड घालून द्यावे.