फ्रुट कॉकटेल

साहित्य :

  • प्रत्येकी एक-एक ग्लास अननस
  • संत्र रस
  • लिंबाचा रस
  • ३ ग्लास पाणी
  • साखर
  • मीठ

कृती :

अननस, संत्र व लिंबाचा रस व पाणी एकत्र करून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ व साखर घालून हे मिश्रण व्यवस्थित ढवळावे. सजावटीकरता ग्लासमध्ये अननसाचे तुकडे वर घालावेत.