फ्रुट पंच

साहित्य :

  • ४ कप गार पाणी
  • ५०० ग्रॅम साखर
  • २ कप संत्र्याचा रस
  • १ कप लिंबाचा रस
  • २ कप अननसाचा रस

कृती :

साखरेत पाणी घालून १० मिनिटे उकळावे. नंतर हे पाणी गार झाल्यावर त्यात संत्र्याचा, लिंबाचा, अननसाचा सर्व रस ओतावे व फ्रिजमध्ये गार होण्यास ठेवून द्यावे. आपल्याला हवे असल्यास अथवा पाहुणे आल्यावर थंडगार पाणी घालून सर्व्ह करावे.