गाढव आणि कावळा

एका गाढवाच्या पाठीवर एक कावळ बसला आणि त्यास टोचु लागला. त्यास उडवून लावण्यासाठी गाढवाने आपले अंग हालविले व तो मोठमोठयाने ओरडू लागला. ती मौज पाहून जवळच एक मनुष्य होता तो हसू आगला. इतक्यात एक लांडगा त्या ठिकाणी आला, तो हा प्रकार पाहून म्हणतो, ‘लोक किती अन्यायी आहेत ! या कावळ्याच्या ठिकाणी जर मी असतो, तर लोकांनी माझा पाठलाग करून मला मारिले असते. जी गोष्ट कावळ्याने केली असता नुसत्या हसण्याला कारण होते, तीच गोष्ट मी केली, तर ती माझ्या मरणाला कारण होते, तेव्हा हा न्याय मोठा विलक्षण म्हटला पाहिजे !’

तात्पर्य:- अपराधाचे महत्त्व सारखेच असता, शिक्षा कमीअधिक होते, याचे कारण न्यायाधीशाचा स्वभाव.