गाडीवाला आणि गाडीचे चाक

एक गाडीवाला आपली गाडी रस्त्याने चालवीत असता, त्या गाडीचे एक चाक कमी मजबूत होते, ते वरचेवर करकरू लागले. तेव्हा तो गाडीवाला त्यास विचारतो, ‘दुसरे चाक गुपचुपपणे आपले काम करीत असता, तूच जी एवढी ओरड चालविली आहेस, याचे कारण काय ?’ चाक उत्तर करिते, ‘दादा, त्रास होऊ लागला म्हणजे कुरकूर करावी आणि रडावे, हा माझ्यासारख्या अशक्तांचा हक्कच आहे.’

तात्पर्य:- ज्याची प्रकृति नीट नाही, किंवा ज्यास शक्तीपलीकडे काम करावे लागते, त्याने त्याबद्दल तक्रार करावी, हे साहजिकच होय.