गाजराची आमटी

साहित्य :

 • २ गाजरे
 • अर्धी वाटी खोबाऱ्याचा कीस
 • पाव वाटी तीळ
 • पाव वाटी दाण्याचे कुट
 • हळद
 • हिंग
 • मोहरी
 • तिखट
 • ४ वाट्या पाणी
 • काळा मसाला
 • अर्धा चमचा जिरे पावडर
 • पाव वाटी तेल फोडणीसाठी
 • मीठ

कृती :

प्रथम गाजरे धुवून घ्यावी. नंतर ती बारीक करून घ्यावेत. हे मिश्रण पातेल्यात टाकून ढवळावे व नंतर त्यात तिखट, मीठ, काळा मसाला व अर्धा चमचा जिरे पावडर टाकावी. आमटी उकळली की ती खाली उतरवावी. पळीत तेल, मोहरी, हिंग व हळद घालून खमंग फोडणी द्यावी. ही आमटी भाताबरोबर छान लागते. ही आमटी ४ माणसांना पुरते.