गणपतीस श्रीगणेश म्हणू लागले

गणपतीस श्रीगणेश म्हणू लागले

गणपतीस श्रीगणेश म्हणू लागले

कैलास पर्वतावर शंकर-पार्वती गजाननासह वास्तव्य करुन होते. तेव्हाची ही कथा.

एकदा शंकर निद्रिस्त असता जवळच बालगणपती खेळत होते. खेळता खेळता त्याचे लक्ष शंकराच्या मस्तकावरील चंद्राकडे गेले. त्याने लगेचच तो चंद्र काढून खेळावयास घेतला. त्या चंद्राशी खेळत-खेळत बालगणपती दूरवर गेले.

थोड्या वेळाने शंकर जागे झाले. जागे झाल्यावर पाहतात तो काय? त्यांना आपल्या मस्तकावरील चंद्र नाहीसा झाल्याचे आढळ्ले. तेव्हा त्यांनी नंदी व आपले गण यांना बोलावून घेतले. आणि चंद्राबद्दल विचारले. तेव्हा गणांनी चंद्र गणपतीच्या हातात पाहियाचे सांगितले. तेव्हा शंकरांनी गणपतीकडून चंद्र घेऊन येण्यास नंदी व गणांना फर्मावले. हुकूमाप्रमाणे गण आणि नंदी निघाले गणपतीकडून चंद्र आणण्यास!

एके ठिकाणी त्यांना गणपती चंद्राशी खेळताना दिसला त्याला ते धरावयास जाणार इतक्यात गणपती एकदम गुप्त झाला. आणि दूरवर गणांच्या व नंदीच्या दृष्टीस पडला. तेथे ते गणपतीस पकडावयास गेले तर पुनः गणपती गुप्त झाला. अशाप्रकारे एकदा गुप्त होऊन तर एकदा प्रगट होऊन, एकदा अतिशय जड होऊन तर एकदा आपल्या श्वासाबरोबर गणांना व नंदीला गणपतीने जर्जर केले. शेवटी त्यांच्या शक्तीची घमेंड उतरल्यावर गण थकलेले पाहताच गणपती त्यांना शंकराच्या पायाशी बसलेला आढळून आला. आणि चंद्रही शंकराच्या मस्तकावरच होता. हा चमत्कार पाहून गण व नंदी शंकरास म्हणाले, “अहो शंकर चंद्र तर आपल्या मस्तकीच आहे!”

हे ऐकून शंकरांनी मस्तकावर हात लावून पाहिले तर खरेच, चंद्र जागच्या जागीच होता. त्या दिवसापासून गणपतीच्या बाललीलांचा चमत्कार पाहून शंकराच्या गणांना गणपतीच्या अफाट सामर्थ्यांची कल्पना आली. आणि ते गणपतीच्या आज्ञेत वागू लागले. म्हणून लोक त्यांना गणांची अधिपती ‘गणपती’ किंवा गणांचा ईश्वर म्हणजेच ‘गणेश’ म्हणू लागले.