गझल गायक जगजित सिंह यांचे निधन

गझल गायक जगजित सिंह यांचे निधन

गझल गायक जगजित सिंह यांचे निधन

गजलसम्राट जगजित सिंह यांनी सोमवारी सकाळी जगाचा निरोप घेतला. गेले काही दिवस त्यांच्या मेंदूतील रक्तस्रावावर लिलावतील रुग्णालयात उपचार सुरू होते.

२३ सप्टेंबर रोजी त्यांना मेंदूतील रक्तस्रावाचा त्रास सुरू झाल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसनाचा आधार घेऊन उपाचार सुरू होते. पण सोमवारी आठच्या सुमारास त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे थांबवले आणि अखेरचा श्वास घेतला.