घोड्याचं चित्र

शाळेतून घरी येताच गुजू आपल्या म्हणाला, ” बाबा! आमच्या चित्रकलेच्या गुरुजींमध्ये काही अर्थ नाही. अहो, त्यांना साधं घोड्याचं चित्रही ओळखता येत नाही.
“अरे असं कसं होईल? ” असं वडील म्हणताच गुजू म्हणाला,
“बाबा, मी अगदी खरं तेच सांगतोय. चित्रकलेच्या तासाल गुरुजींनी वर्गातल्या सर्व मुलांना घोड्याच चित्र काढायला सांगितलं. मी त्याप्रमाणे माझ्या वहीत घोड्याच चित्र काढून त्यांना दाखवलं, तर त्यांनी मला विचारलं,
गुजू! मी तुम्हा सर्वांना घोड्याच चित्र काढायला सांगितलं असता, तू हा डोमकावळा कशाला काढलास?”