गिधाड आणि त्याचे पाहुणे

एक गिधाडाने आपल्या वाढदिवशी, सगळ्या पक्ष्यांस आपल्या घरी मेजवानीस येण्याचे आमंत्रण दिले. ठरलेल्या वेळी सगळे पक्षी त्याच्या घरी जमा झाले. मग त्या गिधाडाने घराचा दरवाजा लावून घेतला, आणि पाहुण्याचा आदरसत्कार ऐवजी त्या सर्वांस त्याने मारून खाल्ले.

तात्पर्य:- ज्यास अब्रूची चाड नाही व जो सदासर्वदा बुभुक्षित, अशा माणसावर विश्वास ठेवण्यास एकाएकी तयार होणे हा मूर्खपणा होय.