गृहस्थ आणि मूर्ख नोकर

एका गृहस्थाचा नोकर महामूर्ख होता, त्यास तो गृहस्थ जेव्हा तेव्हा ‘तु सगळ्या मूर्खाचा राजा आहेस ’ असे म्हणत असे. एके दिवशी तो याप्रमाणे त्यास बोलला असता, तो नोकर संतापून त्यास म्हणाला, ‘तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी खरोखरच सगळ्या मूर्खांचा राजा झालो तर फार चांगले होईल कारण माग जगातले तुमच्यासुद्धा सगळे लोक माझे प्रजाजन होतील.’

तात्पर्य:- वस्तुतः जगातले सगळेच लोक मूर्ख आहेत; त्यांत जो कमी मूर्ख असेल, त्यास आम्ही मोठा शाहणा म्हणतो, इतकेच.