गुळाचे शंकरपाळे

साहित्य :

  • ३ वाट्या कणीक
  • २ टे. चमचा डालडाचे मोहन
  • पाव वाटी बारीक चिरलेला गुळ
  • पाव चमचा मीठ
  • ४-५ वेलदोड्याचि पूड.

कृती :

कमी पाण्यात गूळ विरघलवून घ्या. तूप फेसून घ्या. नंतर सर्व एकत्र करून घट्ट पीठ भिजवा. तासाभराने मळून गोड शंकरपाळे करावे.