हंस आणि बगळे

काही हंस आणि बगळे एका शेतातले धान्य खात असता, त्या शेताचा मालक अकस्मात्‌ तेथे आला. त्यास पाहताच, बगळे हलक्या अंगाचे असल्यामुळे ताबडतोब उडून गेले व हंस, जड अंगाचे असल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या तावडीत सापडून प्राणास मुकले.

तात्पर्य:- दृष्टांच्या संगतीत सापडलेले सज्जन शिक्षेस पात्र होतात.