बाळ ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा

बाळ ठाकरे

बाळ ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे गुरुवारी सांगितले. ठाकरे यांना श्वसनाला त्रास होत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बाळासाहेब यांची प्रकृती उत्तम आहे पण दोन-तीन दिवस त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येईल, असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील परकार यांनी स्पष्ट केले.

ठाकरे यांना भेटण्यासाठी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हॉस्पिटलमध्ये गेले होते.