कोकणात पावसाचा जोर जनजीवन विस्कळीत

कोकणात पावसाचा जोर जनजीवन विस्कळीत
कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सरासरी १५०मीमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रत्नागिरी, चिपळूण व राजापूरमध्ये पावसाचे पाणी शिरून रस्त्यावर ठिकठिकाणी जमा झाले आहे. कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शेती व रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

याचा फटका रेल्वे वाहतूकीवरही झाला आहे. पोमेंडी येथे रेल्वे रूळावर चिखल व माती वाहून आली आहे,सिंधुदुर्गात तळगावजवळ दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.संगमेश्वर स्थानकात दादर-सांवतवाडी रेल्वे थांबविण्यात आली आहे. नेत्रावती एक्सप्रेस कणकवली स्थानकात थांबविण्यात आली आहे.