धो धो कोसळला मान्सून

धो धो कोसळला मान्सून

कोकणात वेळेअगोदर येऊन तब्बल ११ दिवसांच्या सुट्टीनंतर मान्सूनने आज धो-धो कोसळून आपले अस्तित्व दाखवले. मान्सून पूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांशी भाग, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांमध्ये दखल झाला आहे. मान्सूनसाठी हवामान अनुकूल असल्यामुळे उद्या तो पूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तविला आहे. केरळमध्ये ज्या तारखेला मान्सूनच्या दखल होण्याची अपेक्षा होती, त्या मानाने मान्सून तेथे उशीरा पोहोचला.

त्यामुळे महराष्ट्रातही मान्सून उशीरा पोहोचणार अशी शक्यता वाटत होती तळकोकणात मान्सून एक दिवस अगोदर म्हणजे ६ जूनलाच दाखल झाला. त्याने दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी भागांमध्ये एका दिवसात हजेरी लावली. पण हवामान स्थिती नसल्यामुळे तो तेथेच अडकून पडला. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती तेव्हा निर्माण झाली जेव्हा जेव्हा बंगालच्या उपसागारामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले. काल मध्य महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकला होता आणि आज त्याने मोठी मजल मारली.

पुणे, अहमदनगर, महाबळेश्वर, मालेगाव, नाशिक, सोलापूर, मुंबई, अलिबाग, डहाणू, अकोला, ब्रम्हपूरी आदी भागांमध्ये मान्सून आज दिवसभरात पोहोचला आहे. साधारण १० जूनपर्यंत विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनचे आगमन होते. यावेळेस त्याला सात दिवसांच उशीर झाला. पुढील २४ तासांत मान्सून महाराष्ट्रातील सर्व उर्वरित भागांमध्ये दाखल होईल, असा आयएमडीने वर्तविला आहे.