ताडोबा प्रकल्पात हाय अलर्ट

भारतीय वाघ

भारतीय वाघ

विश्वसनीय वृत्त समजले की ताडोबा अभयारण्यात संशयित शिकारी टोळी घुसली आहे. ताडोबा व्यवस्थापनाने यास दुजोरा दिला आहे व प्रकल्पात हाय अलर्ट घोषित केला आहे.

रविवारी काळे कपडे परिधान केलेली आठ जणांची टोळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात शिरली. वामनगाव परिसरात वनमजुरांनी या टोळीला बघितले. वनमजुरांची संख्या कमी होती व या भीतीपोटी त्यांनी या टोळीला हटकले नाही. वनमजुरांनी ही माहिती ताडोबा व्यवस्थापनाला दिली व संपूर्ण प्रकल्पात ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांनी संशयित शिकारी टोळीचा शोध सुरु असल्याची माहिती दिली. या टोळीचा शिकारी करण्याबाबत काय उद्देश आहे, हेही जाणून घेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.

या प्रकल्पा सोबतच बफर झोनमध्येही सतर्कता पाळण्यात येत आहे.