ह्या दिव्याच्या सोबतीला

ह्या दिव्याच्या सोबतीला ही जीवाची वात आहे
अंतरिची वेदना पुन्हा तेच गीत गात आहे.
राहीले कोणत्या दिशेला स्वप्नातले गाव माझे
मी असा वेडावूनी सांगा कुठे जात आहे
देऊ नका असा मला तुम्ही भरवसा
प्रत्येक पावलांच्या चाहूलीला आज इथे वात आहे
होऊनी बेघर सारे शब्द पसरले गावातले
बोलणारी वाट त्याची काळजाच्या आत आहे
नाईलाजाच्या गळ्यात लोंबती आडचणीचे फास सदा
मजबूर माणसाची ही कुठली जात आहे.

This entry was posted in मराठी कविता and tagged , , , , , , on by .

About संतोष सेलुकर

सध्या प्रार्थमिक शिक्षक. चार वर्ष सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमात विषयतज्ञ म्हणून कार्य. कविता संग्रह "दुरचे गाव" प्रकाशित झाला असुन अनेक वृत्तपत्रे मासिके यामधून कविता व ललित लेख प्रसिद्ध. १] राज्यस्तरीय कविता स्पर्धेत प्रथम क्रमांक. २] अखिल भारतिय साहित्य संमेलन नाशिक येथे कविता वाचन - विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली. ३] जागल प्रतोष्ठाण पेठशिवणी, तेजोमयी प्रतिष्ठाण परभणी, चक्रधर स्वामी वाचनालय पालम यांच्या विविध कार्यक्रमांचे(वाड़मयीन) आयोजन व सहभाग. ४] विविध शैक्षणिक प्रशिक्षणातून तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले.