पुण्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

पुण्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ‘पीएमपीएल’ च्या २७ गाड्यांवर बंदच्या काळात दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी भाजपच्या दोन आमदारांसह ४२९ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पुण्यातल्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊन बंदमुळे हाल झाले. बंदचा विशेष प्रभाव पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात जाणवला नाही.

पुण्यात ‘बंदला’ लक्षमी रस्ता, बाजीराव रस्ता, डेक्कन, कोथरुड, टिळक रस्ता आणि तुळशीबाग येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात ठिकठिकाणी भाजप-शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पुण्यात सकाळी ‘पीएमपी’च्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आलेल्या भागांपैकी डेक्कन, कोथरुड, महापालिका भवन, बाजीराव रस्ता, दापोडी, चिंचवड यांचा समावेश आहे. आज नेहमीपेक्षा एस. टी. आणि रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची संख्या कमी होती. रस्त्यावरील वाहनांची दरवळ त्यामुळेच मंदावली आहे. रिक्षा संघटना या बंदमध्ये सामील नसतानाही रस्त्यावरील रिक्षांची संख्या कमी होती.

स्वारगेट स्थानकावरून मुंबई जाणार्‍या काही गाड्यांना प्रवाशांनी पाठ फिरविल्यामुळे फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आमदार देवेंद्र फडवणीस, गिरीश बापट, भीमराव तापकीर, शहराध्यक्ष विकास मठकरी आदी सहभागी झाले होते. पोलिसांनी आमदार बापट व फडवणीस यांना अटक करुन सोडून दिले. बरेचसे पेट्रोल पंप पिंपरी-चिंचवड परिसरात बंद होते. शहराच्या विविध भागांत शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून बंदचे आवाहन केले. मात्र, बंदला तुलनेने पुण्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. चेन्नई एक्स्प्रेसला आंदोलकांनी लोळावण्यात वीस मिनिटे रोखून धरली. जेजुरी, दौंड, मंचर, राजगुरुनगर आदी ठिकाणीच बंदला जास्त प्रतिसाद मिळाला.