जर्दाळू पुडिंग

साहित्य :

  • ५०० ग्रॅम स्पंज केक
  • २५० ग्रॅम जर्दाळू
  • १५० ग्रॅम क्रीम
  • १ वाटी अक्रोडचा भरड चुरा
  • २ कप दुध
  • १ मोठा चमचा कस्टर्ड पावडर
  • ३ मोठे चमचे साखर
  • ८-१० चेरी

कृती :

जर्दाळू पुडिंग

जर्दाळू पुडिंग

दीड कप पाण्यात जरदाळू भिजत ठेवावे व त्यातला बिया काढाव्या.

त्याच पाण्यात १ मोठा चमचा साखर घालून जरदाळूचे तुकडे घालावेत व चुलीवर मंद आंचेवर ठेवावेत.

जरदाळू नरम होऊन पाणी दाटसर होईपर्यंत उकळावे. एका कांचेच्या भांड्यात तळाला केकचे तुकडे रचावे व त्यावर जरदाळू व त्याचे पाणी घालावे.

दुधात उरलेली साखर घालून दूध उकळावे. थोड्या गार दुधात कस्टर्ड पावडर मिक्स होईपर्यंत ढवळावे.

मिश्रण घट्ट होऊ लागले की खाली उतरवावे. निवाल्यानंतर केक व जरदाळूमध्ये ओतावे.

चमच्याने सगळीकडे सारखे पसरावे. क्रीममध्ये थंडगार करून वाढावे.