ज्वारीच्या लाह्य़ांच्या वडय़ा

साहित्य:

  • ज्वारीच्या लाह्य़ा
  • जिरे
  • थोडासा हिंग
  • दही
  • मीठ

कृती:

लाह्य़ा, जिरे, हिंग, मीठ, लाह्य़ा भिजतील एवढे दही घ्यावे. (दही सायीचे घेऊ नये) ज्वारीच्या लाह्य़ांमध्ये कचकच असते म्हणून त्या पाण्यातून काढून घ्याव्यात, म्हणजे त्यातली वाळू पाण्यात निघून जाते. हे सर्व मिक्स करून त्याच्या बारीक बारीक वडय़ा कराव्यात व उन्हात वाळवाव्यात. वाळल्यावर त्या बरणीत भरून ठेवणे. तळून व न तळाता खायलाही या छान लागातात.