का कसा ठावूक कोणा

का कसा ठावूक कोणा, आठवाया लागलो
गीत दुःखाचेच आत, आळवाया लागलो.

कोणता अपराध माझा, काय केले पाप हे
पुण्य माझे मीच आता, बाटवाया लागलो.

कोण होते लोक माझ्या, भोवताली काल ते
का कळेना मीच आता, लाजवाया लागलो.

भेटले ना कोण जेव्हा, शोधले यात्रेत मी
मी मला वाटेत आता, चालवाया लागलो.

संपल्या वाटा तिथे मी, जावूनी पोहोचलो
बंद दारी मीच आता, घालवाया लागलो.