कच्च्या दाण्यांची कडबोळी

साहित्य :

  • शेंगदाणे अर्धा किलो
  • तिखटपूड
  • जिरेपूड
  • मीठ
  • तळणीसाठी तूप

कृती :

दाणे जाडसर कुटा. त्याची फोलपटे पाखडून काढा. परत दाणे चांगले कुटून घ्या. मग त्यात तिखटपूड, जिरेपूड, मीठ घाला. थोडी पाणी घालून मळून घ्या. या मिश्रणाची कडबोळी घाला. लालसर रंगावर तळून खा.