कडबू

साहित्य :

  • १ फुलपात्र हरबऱ्याची डाळ
  • १ फुलपात्र बारीक चिरलेला गूळ
  • अर्धा नारळ
  • थोडे काजूचे काप व थोडा बेदाणा
  • ४ वेलदोड्यांची पूड
  • पाव जायफळाची पूड
  • दीड फूलपात्र कणीक
  • थोडे मीठ व तेलाचे मोहन.

कृती :

आपण नेहमी पुरणपोळीसाठी पुरण शिजवतो तसे शिजवावे. त्यात गूळ घालावा. पुरण साधारण घट्ट होत आले की, त्यात ओले खोबरे, काजूचे काप, बेदाणे, वेलदोडे व जायफळ यांची पूड घालावी व जरा वेळ हलवत राहावे. चांगले घट्ट झाले की उतरवावे.तेल व मीठ घालून कणीक घट्ट भिजवावी. चांगली मळावी व त्याच्या पुऱ्या लाटून, त्यात पुरणाचे सारण भरून करंज्या कराव्या. कातण्याने कपून तळाव्या. पुरण भरलेल्या करंज्याम्ना कडबू म्हणतात.