कढी

साहित्य :

 • ४ भांडी आंबट ताक
 • २ चमचे साखर
 • मीठ अंदाजे
 • १ चमचा डाळीचे पीठ
 • २ मिरच्या
 • अर्धा इंच आल्याचा तुकडा
 • ८-१० कढीलिंबाची पाने
 • पाव चमचा हळद
 • अर्धा चमचा जिरे
 • पाव चमचा हिंग
 • २ चमचा साजूक तूप
 • कोथिंबीर

कृती :

ताकाला डाळीचे पीठ लावून त्यात मीठ, साखर, किसलेले आले घालावे. गरम करत ठेवावे. तूप गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद, कढीलिंब व मिरच्या घालून फोडणी करावी व गरम कढीत ओतावी. कोथिंबीर खाली उतरल्यावर घालावी.