कैरीचे पन्हे -प्रकार 3

साहित्य :

  • ५०० ग्रॅम कैऱ्या
  • मीठ
  • साखर
  • चवीप्रमाणे वेलची पूड

कृती :

कैरीचे साल काढून ती किसून घ्यावी. नंतर थंड पाण्यात हा कीस टाकून तो कुस्करून घ्यावा. नंतर त्यात अंदाजाने मीठ व साखर घालावी. गाळण्यातून गाळून घ्यावे व नंतर त्यात वेलची पूड टाकावी. हे पन्हे आयत्यावेळी करता येते.