कलिंगडाचे सरबत

साहित्य :

  • कलिंगडचा रस १ लि.
  • १ लि.पाणी
  • २ किलो साखर
  • अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड(रंग व इसेंस नाही.)
  • १ चमचा सोडिअम बेन्झॉइट

कृती :

प्रथम कलिंगडाचा १ लि. रस काढावा. साखर २ किलो व १ लि. पाणी एकत्र करावे त्यात सायट्रिक अ‍ॅसिड घालून ढवळावे. गॅसवर एक उकळी येईपर्यंत ढवळत राहावे. नंतर गॅस बंद करावा. सिरप थंड झाल्यावर त्यात कलिंगडाचा रस एकत्र करावा. बाटलीत भरून ठेवावा. सरबत देताना पाव भाग तयार केलेले
सिरप व पाणी पाऊण भाग एकत्र करावे. बर्फाचा खडा घालावा.