कणकेचे थालिपीठ

साहित्य :

  • १ वाटी कणिक
  • २ चमचे तीळ (पांढरे)
  • १ मध्यम कांदा
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा मीठ
  • ३ चमचे तेल
  • तळण्यासाठी तेल.

कृती :

कणकेचे थालिपीठ

कणकेचे थालिपीठ

कांदा व मिरच्या बारीक चिराव्यात. कणकेत घालून पीठ, तीळ व ३ चमचे तेल त्यात मिसळावे. लागेल तसे पाणी वापरून कणिक मऊसर भिजवावी.

केळीच्या पानावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर थापून, तेल सारवलेल्या तव्यावर गुलाबी रंगावर भाजावीत. बाजूने तेल सोडावे व दोन्ही बाजू शेकल्यानंतर गरमगरम खायला द्यावीत.

बरोबर लोणी, तूप व आंब्याचे लोणचे द्यावे.