कराची हलवा

साहित्यः

  • १०० ग्रा. मक्याचे पीठ
  • १०० ग्रा. तूप
  • ४०० ग्रा. साखर
  • काही थेंब गुलाब पाणी
  • २ मोठे चमचे कापलेले बदाम
  • २ मोठे चमचे कापलेले काजू
  • १ छोटा चमचा लिंबाचा रस

कृतीः

मक्याच्या पिठास तीन चतुर्थांस कप पाण्यात साखर मिळवून उकळवावे. लिंबाचा रस मिळवावा. परत उकळावे गॅस कमी करावा. थोडेसे मक्याचे पिठाचे मिश्रण मिळवावे आणि हलवत रहावे उकळल्यानंतर सर्व मिश्रण मिळवेपर्यंत ही पद्धत चालू ठेवावी. मिश्रण घट्ट होऊन चिकट होईपर्यंत शिजवावे. गॅस बिलकुल कमी करावा. आता थोडे से तूप टाकुन चांगल्या तऱ्हेने मिळवावे. तूप मुरल्यानंतर थोडेसे तूप अजुन मिळवावे याला सुरू द्यावे, सर्व याच पद्धतीने मिळवावे.एक चमचा मिश्रण एका प्लेटमध्ये ठेवावे जर हे चिटकले नाही तर गॅसवर काढुन घ्यावे. गुलाब पाणी मिळवून तुप लागलेल्या प्लेटमध्ये काढुन घ्यावे. कापलेले बादाम व काजू यावर लावावे. मनासारख्या आकारात कापून घ्यावे.