करंजी

साहित्य:

  • ५०० ग्रॅम मैदा
  • १ किलो तूप
  • १/२ किलो खवा
  • ३५० ग्रॅम वाटलेली साखर
  • २५ ग्रॅम काजू
  • २५ ग्रॅम बदाम
  • २५ ग्रॅम किसमिश
  • २५ ग्रॅम नारळाची पावडर
  • १ चमचा वेलची पावडर

कृती:

अगोदर खवा मळून कढईत टाकून हलका ब्राऊन होईपर्यंत भाजा. थंड झाल्यावर त्यात साखर, काजू, बदाम, किसमिश व वेलची पावडर मिसळा. हे मिश्रण भरण्यासाठी आहे. मैदा गाळून त्यात १०० ग्रॅम तूप टाकून व पाणी घेऊन मळा. ओला कपड्याने झाकून ठेवा. लहान आकाराचे गोळे बनवून लाटा. यात एक चमचा तयार मिश्रण भरून किनार्‍यांवर पाणी लावून करंजीच्या आकारात वळून घ्या व किनारे दाबून चिकटून द्या. अशा प्रकारे सगळ्या करंज्या बनवून तूपात तळून घ्या.