कारल्याची भाजी करताना

कारले

  • कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात.
  • स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा. स्वच्छ होतील.
  • बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वचा व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका.
  • पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या. बरे वाटेल.
  • घरातील कोणताही पंखा (एक्झॉट फॅनसुद्धा) स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंधी बुडवून त्याने फॅन घासून पुसा.
  • भाजा फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा. दोन-तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा.
  • कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा.
  • दोसा बनविताना दोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा.