कासव आणि गरुड पक्षी

एक कासव भुईवर चालता चालता कंटाळले. त्यास असे वाटले की, आकाशातून पॄथ्वीवरील देखावा कसा दिसतो, तो पहावा. मग ते पक्ष्यांकडे जाऊन त्यांस म्हणाले, ‘जो कोणी मला आकाशातून फिरवील आणि सृष्टीचे कौतुक दाखवील, त्यास मी पृथ्वीच्या पोटातल्या रत्नांच्या खाणी दाखवीन. ’ गरुड पक्ष्याने ती गोष्ट कबूल करून, कासवास आकाशातुन पृथीवरील सर्व चमत्कार दाखवीले. मग खाली उतरल्यावर तो कासवास म्हणाला, ‘अरे, आता तुझ्या रत्नांच्या खाणी कोठे आहेत ते मला दाखव.’ त्या वेळी त्या कासवाने वेडयाचे सोंग घेऊन गरूडास फसविण्याचा विचार केला. ती त्याची लबाडी पाहून गरूडास फार राग आला आणि त्याने त्याच्या नाजूक ठिकाणी आपली नखे रोवून त्यास तात्काळ मारुन टाकले.

तात्पर्य:- बोलण्याप्रमाणे आपले वर्तन झाले नाही तर लोक आपणास लबाड म्हणतील; इतकेच नव्हे तर लबाडी करून दुसऱ्यास फसविण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य प्रसंगी आपल्या प्राणासही मुकेल