कशाला पैसे खर्च करतोस

म्हातारपणामुळं कमरेत पार वाकलेला एक मनुष्य रस्त्याने चालला असता, त्याला एक तरुणाने खवचटपणानं विचारलं, ‘आजोबा ! तुम्ही हे तुमच्या कमरेत लपविलेलं मनुष्य मला विकत देता का ?

अनुभवाचे अनेक पावसाळे अंगावर जिरवलेला तो म्हातारा पटकन त्या तरुणाला म्हणाला, ‘बाबारे, तुम्ही सध्याची ही तोळामासा प्रकृती लक्षात घेता तुला माझ्याइतकं जगण्याचं भाग्य लाभेलसं मला वाटत नाही; पण त्यातून तू जगलास, तर माझ्याएवढा म्हातारा होण्यापूर्वीच तुला माझ्यासारखं ‘धनुष्य’ पैसे न मोजता मिळेल. मग आत्ता कशाला उगाच पैसे खर्च करतोस ?’
त्या वृध्द माणसाच्या या उत्तरानं तो तरुण पार खजील होऊन तिथून नाहीसा झाला.