कावळा आणि कुत्रा

एका कावळ्याने सटवाईस काही वस्तू अर्पण करण्याचे ठरविले. तेव्हा आपल्याबरोबर येण्याविषयी कुत्र्यास त्याने विनंती केली. म्हणाला, ‘देवीला तुझा इतका कंटाळा आहे की, तू दिलेल्या वस्तूचा ती मुळीच स्वीकार करणार नाहे.’ यावर कावळा म्हणतो, ‘अरे, यासाठीच तर मी तिला या वस्तू भेट देण्याचे ठरविले आहे. तिची मजवरची अवकृपा नाहीशी होऊन तिने माझे कल्याण करावे या हेतूनेच मी तिला या वस्तू अर्पण करणार आहे.’

तात्पर्य:- देव आपले अकल्याण करील या भीतीने देवीची पूजा करणारे खूप असतात, खऱ्या भक्तिभावाने देवाची पूजा करणारे थोडेच.