केळफुलाची भाजी

साहित्य :

  • १ सोललेले केळफूल
  • अर्धी वाटी तेल
  • १ चमचा तिखट
  • मीठ
  • लिंबाएवढा गूळ
  • ४ आमसुले
  • १ चमचा गोडा मसाला
  • कोथिंबीर
  • फोडणीचे साहित्य

कृती :

एका पातेल्यात ४-५ भांडी पाणी घेऊन त्यात आमसुले टाकावी. केळफूल चिरून झाल्यावर त्यात घालावे व पाण्याला १ उकळी काढावी. १० मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर ती चाळणीत ओतावी म्हणजे केळफूलाचा तुरटपणा जाऊन भाजी काळी पडणार नाही. तुरट पाणी टाकून द्यावे. कोरडी झालेली केळफुले तेलात
मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणीला टाकावीत. त्यात वरील साहित्य घालून भाजी परतावी व उतरल्यावर कोथिंबीर घालावी.