केळ्याचे पीठ

केळ्याचे पीठ

केळ्याचे पीठ

साहित्य:

  • अर्धा डझन कच्ची केळी
  • तीन वाट्या पातळ ताक
  • मीठ

कृती:

प्रथम केळी सोलून त्याचे पातळ काप करून मीठ घातलेल्या ताकात घालून अर्धा तास भिजत ठेवा. नंतर एका चाळणीत ते गाळून ताक निघून गेले, की लगेच पातळ कपड्यांवर उन्हात कडक वाळवाव्यात. नंतर त्याचे पीठ करावे. उपवासाच्या दिवशी हवे तेवढे पीठ घेऊन त्यात दाण्याचे कूट, मीठ, कोथिंबीर, लाल तिखट, चवीपुरती साखर घालून घट्ट पाण्याने मळून तुपावर थालिपीठ भाजावे.