साहित्य :
- ६ कच्ची केळी
- २ वाट्या डाळीचे पीठ
- ४ चमचे तिखट
- अर्धा चमचा हळद
- पाच चमचा हिंग
- १ डाव तांदळाचे पीठ
- २०० ग्रॅम तेल
कृती :
केळ्यांची साले काढून त्याचे लांब काप करावेत. डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, तिखट, हळद, हिंग, मीठ घालून १ पळीभर गरम तेल घालून भज्यांना लागते तसे भिजवावे. त्यात एकेक काप बुडवून भजी तळावीत व गरम गरम खावीत.
टीप : पिकलेल्या केळ्यांची व ओव्याच्या पानांची अशीच भजी करता येतात.