केशर दही

साहित्य:

  • १ लि. दूध
  • ८० ग्रॅम साखर
  • १ ग्रॅम केशर
  • १ थेंब केवडा
  • ५ ग्रॅम दही
  • १० ग्रॅम बदाम

कृती:

दूध अर्धे आटेपर्यंत उकळा. ३० मिली. वेगळे काढून ठेवा. बाकी दुधात साखर मिसळा. वेगळ्या काढलेल्या दूधात केशर मिसळा. गरम पाण्यात बदाम भिजवून सोलून बारीक कापून ठेवा. कोमट दूध मातीच्या हांडीत टाकून त्यात केशर व केवडा मिसळा. नंतर दही लावण्यासाठी दही टाकून हलवा व दही जमविण्यासाठी ५-६ तास गरम जागेवर ठेवून द्या. दही लागल्यावर फ्रिजमध्ये ठेवा. वाढतांना फ्रीजमधून काढून कापलेले बदाम वरून टाकून वाढा.