खजुराचा शेक

साहित्य :

  • अर्धा लि.दूध
  • अर्धी वाटी साखर
  • १ चमचा कस्टर्ड पावडर
  • ५-६ खजूर
  • बर्फाचा चुरा

कृती :

प्रथम खजूर धुऊन चिरून घेणे. नंतर ते भिजवून ठेवावे. दूध, साखर व कस्टर्ड पावडर एकत्र करून कस्टर्ड करून घेणे. हे मिश्रण गार झाल्यावर त्यात खजूर घालून ते मिक्सरमधून काढा. खजूर शेक तयार. आवडत असल्यास त्यावर अक्रोडाचा चुरा व बर्फ चुरा सजावटीसाठी वापरावा.