खजुराची बर्फी

साहित्य :

  • २०० ग्रॅम बिनबियाचा खजूर
  • अर्धा नारळ
  • १ वाटी साखर
  • अर्धी वाटी दूध
  • ४-५ वेलदोड्यांची पूड
  • २५ ग्रॅम काजू.

कृती :

थोड्या काजूचे काप करा व बाजूला ठेवा. उरलेल्या काजूची जाडसर पूड करा.नंतर खजूर, खोबरे, दूध, साखर व काजू-पूड एकत्र करून गॅसवर ठेवा. मिश्रण घट्टसर होत आले की वेलदोड्याची पूड घाला. नंतर घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत थापा. त्यावर काप पसरा. नंतर गार झाल्यावर वड्या पाडा.