खंडोबा आणि बृहस्पति

एके दिवशी खंडोबा रस्त्याने चालला असता, एक विलक्षण प्राणी त्याच्या दृष्टीस पडला. त्या प्राण्याने आपली शिंगे उभारली आणि खंडोबाच्या अंगावर तो चाल करून गेला. खंडोबाने त्याची बिलकूल पर्वा न करता, आपल्या चाबकाने त्यास झोडण्यास सुरुवात केली. परंतु चाबकाचे थोडेसे फटकारे बसताच तो प्राणी पहिल्यापेक्षा तिप्पट मोठा झालेला दिसू लागला . त्यास झोडण्याचे काम खंडोबाने तसेच चालू ठेवले होते. जितका जितका त्या प्राण्यास अधिक मार मिळू लागला, तितका तितका तो अधिकच मोठा होऊ लागला व शेवटी तो इतका लठ्ठ झाला की, त्यामुळे सगळा रस्ताच अडून गेला ! हा प्रकार पाहून तिकडून बृहस्पती आला, तो खंडोबास म्हणतो, ‘तू ह्या प्राण्याला मारण्याचे सोडून दे. ह्या प्राण्याचे नांव स्पर्धा असे असून त्याच्या वाटेस कोणी गेला म्हणजे तो असाच लठ्ठ होऊ लागतो यासाठी त्याला तू सोडून दे, म्हणजे लवकरच तो अगदी लहान झालेला तुझ्या दृष्टीस पडेल.’

तात्पर्य:- स्पर्धेने स्पर्धा वाढत जाते.