खव्या रव्याचे लाडू

साहित्य :

  • पाव किलो रवा
  • १ नारळ
  • २०० ग्रॅम खवा
  • ३ वाट्या पिठीसाखर
  • वेलची
  • बेदाणे
  • अर्धी वाटी तूप

कृती :

रवा तूपात भाजून घ्यावा नारळाचा चव थोडा भाजून घ्यावा व वेलची बारीक करून घ्यावी नंतर हे सर्व एकत्र करून पिठीसाखर घालावी व चांगले मळून घ्यावे एक एक बेदाणा घेऊण लाडू वळावेत.