खेकडा व त्याचे पोर

एके दिवशी एक खेकडा आपल्या पोरास म्हणाला, ‘मुला, तू असा वाकडा काय चालतोस? इतर प्राणी जसे सरळ चालतात, तसा तू का चालत नाहीस ?’ पोर उत्तर करते, ‘बाबा, तुम्ही जसे चालता तसे मीही चालतो तथापि, सरळ कसे चालावे हे जर तुम्ही मला स्वतःच चालून दाखवले तर पाहून मीही त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करीत.’

तात्पर्य:- जी गोष्ट स्वतःस करता येत नाही, ती दुसऱ्यास करता येईना म्हणून त्यास नावे ठेवणे हा मूर्खपणा होय.