खोबर्‍याची बर्फी

साहित्य :

  • १ नारळ
  • ५०० ग्रॅम साखर
  • पाव किलो खवा किंवा अडीच कप दूध
  • ७-८ वेलदोड्याची पूड.

कृती :

ओले खोबरे, साखर व दूध (खवा) एकत्र करून गॅसवर ठेवा. सतत हालवत रहा. मिश्रण घट्टसर होत आले की वेलदोड्याची पूड घाला. घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत थापा.