मावळे निष्ठावान घडले शिवरायांमुळे

मावळे निष्ठावान घडले शिवरायांमुळे

मावळे

“बळकट गडकोटांबरोबरच निष्टावान मावळे घडविण्याचे काम शिवरायांनी केले,” राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी नुकतेच असे मत व्यक्त केले. चारुदत्त आफळे हे छत्रपती शिवाजी महराजांचा राज्याभिषेक दिन आणि ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर स्मृतिदिनानिमित्त इतिहास प्रेमी मंडळातर्फे आयोजिलेल्या ‘दुर्गदिन’ या कार्यक्रमात बोलत होते. उपस्थितांमध्ये प्रा. विजय देव, डॉ. विणा देव, मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी होते. अरविंद वारुळे ज्यांनी दुर्गसंवर्धनासाठी कार्य केले व दुर्गवीर प्रतिष्ठानाचे शैलेश कंधारे यांच सत्कार करण्यात आला.